"शेतकरी बैल नाही म्हणून जुंपतोय, आत्महत्या थांबत नाहीत!" – वडेट्टीवारांचा सरकारवर जोरदार हल्ला

"शेतकरी बैल नाही म्हणून जुंपतोय, आत्महत्या थांबत नाहीत!" – वडेट्टीवारांचा सरकारवर जोरदार हल्ला

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि ३ जुलै :– “बैल नसल्याने ६५ वर्षांचा शेतकरी स्वतःला नांगराला जुंपतोय, दररोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. जानेवारी ते मार्च या अवघ्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीव दिला!” – अशी खळबळजनक आकडेवारी आणि भावना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मांडली.

वडेट्टीवार म्हणाले, “दुसरीकडे कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात, माजी मंत्री बबनराव लोणीकर आक्षेपार्ह वक्तव्य करतात, आणि शेतकऱ्यांचा सातत्याने अपमान होत आहे. शेतमालाला हमीभाव नाही, सोयाबीन उत्पादकांचे पैसे अडलेत, कापसाला भाव मिळत नाही. निवडणुकीआधी गाजावाजा करून जाहीर केलेली कर्जमाफी फक्त घोषणाच ठरली.”

“सरकार समित्यांच्या मागे लपते आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे – कर्जमाफीसाठी समिती नको, निर्णय हवा! त्यामुळेच आज आम्ही विधानसभेत स्थगन प्रस्ताव सादर केला. मात्र अध्यक्षांनी तो फेटाळला. सरकार शेतकरी प्रश्नांबाबत अत्यंत असंवेदनशील आहे आणि चर्चेपासून पळ काढते आहे. म्हणूनच आम्ही तीव्र निषेध नोंदवला आहे,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

 "शेतकऱ्यांना फक्त मतदार म्हणून पाहायचं, पण न्याय द्यायचा नाही – हाच या सरकारचा खरा चेहरा!"

 शेतकऱ्यांचा आवाज दबवणारं हे सरकार… तुम्ही काय म्हणता?