शशिकांत शिंदे व रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात ७ ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दमदार मेळावा!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ ऑगस्ट :– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पक्ष कार्यकर्ता मेळावा आणि सत्कार समारंभ दि. ७ ऑगस्ट २०२५, गुरुवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी भवन, हडको येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष मा.आ. शशिकांत शिंदे व प्रदेश सरचिटणीस मा.आ. रोहित दादा पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, माजी आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या मेळाव्याद्वारे पक्ष संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विशेषतः रोहित दादा पवार यांची उपस्थिती हा तरुण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी क्षण असणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग तांगडे पाटील (जिल्हाध्यक्ष), विश्वजीत चव्हाण (जिल्हाकार्याध्यक्ष), ख्वाजा शरफोद्दीन (शहराध्यक्ष), आणि आशिष पवार (शहरकार्याध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे
स्थळ: राष्ट्रवादी भवन, हडको, छत्रपती संभाजीनगर
🕚 वेळ: सकाळी ११:०० वाजता, गुरुवार – ७ ऑगस्ट २०२५
“पक्षाचे संघटन हीच ताकद – कार्यकर्त्यांचा आवाज हेच आमचे बळ!”
— महाराष्ट्र वाणी