विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; मतदार यादी त्रुटीमुक्त करण्याचे निर्देश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- विभागीय आयुक्त मा. श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचा आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

बैठकीत बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणे, अर्जांची वेळेत छाननी करणे, पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे तसेच अपात्र नोंदी नियमानुसार वगळणे यावर विशेष भर देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा यांनी जिल्ह्यातील एसआयआर मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन आपल्या परिसरातील बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.

अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा पाया असल्याचे यावेळी विभागीय आयुक्तांनी नमूद केले.

— विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभाग