वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना विक्रमी प्रतिसाद; ४९३ अर्ज, २७२ इच्छुक प्रत्यक्ष मुलाखतीस हजर

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतील इच्छुकांचा ओघ

वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना विक्रमी प्रतिसाद; ४९३ अर्ज, २७२ इच्छुक प्रत्यक्ष मुलाखतीस हजर
वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखतींना विक्रमी प्रतिसाद; ४९३ अर्ज, २७२ इच्छुक प्रत्यक्ष मुलाखतीस हजर

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. २३ :- वंचित बहुजन आघाडीच्या मनपा निवडणुकीसाठी घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आज प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहर-जिल्हा पक्ष कार्यालयात अर्ज स्वीकारून प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाकडे आतापर्यंत ४९३ इच्छुकांचे अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी २७२ जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या आहेत.

या मुलाखती वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा जिल्हा प्रभारी मा. अरूंधतीताई शिरसाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडल्या. यावेळी जिल्हा पश्चिम निरीक्षक योगेश बन आणि जिल्हा पूर्व निरीक्षक प्रभाकर बकले उपस्थित होते.

मुलाखतीदरम्यान एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव गट) येथील इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला जिल्हा व शहर पातळीवरील पदाधिकारी, महिला व युवा आघाडीचे नेते, प्रसिद्धी प्रमुख तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवार निवडीतच ताकद दाखवली—आता मैदानात काय रंगत पाहायला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष!