वंचित बहुजन आघाडीची महापालिका तयारी जोरात; २३ डिसेंबरला इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ :- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
या मुलाखती राज्य कार्यकारिणी सदस्य तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधतीताई शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असून, अमित भाऊ भुईगळ, प्रभाकर बकले आणि योगेश बन हे मुलाखत पॅनेलवर असतील.
मुलाखती वंचित बहुजन आघाडीच्या शहर जिल्हा पक्ष कार्यालय, क्रांती चौक येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती पश्चिम शहर अध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई यांनी दिली आहे.
👉 महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.