“लोकशाही बळकट करणाऱ्या राजीव गांधींना काँग्रेसतर्फे जयंती अभिवादन”
“राजीव गांधींच्या स्मृतींना उजाळा – काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग”
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- देशातील तंत्रज्ञान, दूरसंचार व संगणक क्रांतीचे शिल्पकार, युवकांना राजकारणात नवी दिशा देणारे आणि पंचायतराज व्यवस्थेद्वारे गावोगावी लोकशाही बळकट करणारे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अभिवादन करण्यात आले.
सुभेदारी विश्रामगृहाजवळील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर व शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ, माजी मंत्री अनिल पटेल, सेवा दल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश सचिव अशोक डोळस, जगन्नाथ काळे, अनिस पटेल, भाऊसाहेब जगताप, निमेश पटेल, संतोष मेटे, शेख कैसर बाबा, अशोक बन्सवाल, सलीम खान, चंद्रप्रभा खंदारे, संतोष शेजवळ, सूर्यकांत गरड, एकनाथ त्रिभुवन, रवी लोखंडे, मंजू लोखंडे, सलमा बाजी, श्रेयश चव्हाण, मुजामिल खान, सईद खान, सलीम पटेल, ॲड. अनिल नलावडे, योगेश थोरात, जयपाल दवणे, जावेद खा पठाण, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“राजीव गांधींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन काँग्रेसची वाटचाल सुरूच!”