राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नवी जबाबदारी! शेख रशीद रहिमान यांची शहर जिल्हा सरचिटणीस पदी अधिकृत नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नवी जबाबदारी! शेख रशीद रहिमान यांची शहर जिल्हा सरचिटणीस पदी अधिकृत नियुक्ती

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १२ :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीस पदावर शेख रशीद रहिमान यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सहमतीने, शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला यांच्या शुभहस्ते शेख रशीद रहिमान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नियुक्तीप्रसंगी पक्षातील मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये मुस्ताक साहेब (प्रदेश सरचिटणीस), मोहम्मद हबीब शेख उर्फ मुन्नाभाई (शहर जिल्हा बुथ प्रमुख व शहर जिल्हा उपाध्यक्ष) तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.

या प्रसंगी शेख रशीद रहिमान यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल घेत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. पक्षाच्या धोरणांचा व्यापक प्रसार, संघटन बांधणी, जनसंपर्क वाढवणे आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

शहरात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी शेख रशीद रहिमान यांची ही नियुक्ती सकारात्मक दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.