राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) रणसज्ज! फुलंब्री-सिल्लोडमध्ये आढावा बैठका — “आघाडी करायचीच, पण स्वबळाची तयारी ठेवा”
महाराष्ट्र वाणी डिजिटल
फुलंब्री- सिल्लोड :- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी संघटनबांधणीस गती देत फुलंब्री व सिल्लोड तालुक्यात निवडणूक आढावा बैठका घेतल्या.
या दोन्ही बैठकींना तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उमेदवारी दाखल करण्यास इच्छुक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणनिती, आघाड्यांचे पर्याय, संभाव्य उमेदवारांची चर्चा आणि स्थानिक संघटनबांधणी यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या मतांना प्राधान्य देत पक्षनेत्यांनी स्पष्ट संदेश दिला की — “आघाडी करायचीच आहे, पण स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी ठेवा.”
या चर्चासत्रांना जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, अंभोरे मामा, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथ नाना काळे, लघाने मामा, राजेंद्र पाथ्रीकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाक पठाण, महिला जिलाध्यक्ष छायाताईजंगले,जिल्हा उपाध्यक्ष जाधव, फुलंब्री तालुकाध्यक्ष अझर पटेल, सिल्लोड तालुकाध्यक्ष राहुलकुमार ताठे, तसेच उबेद देशमुख, शेख शफीक यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आगामी निवडणुकीसाठी सज्ज होत असून, स्थानिक पातळीवर पक्ष संघटनाची गती आता अधिक वेगाने वाढताना दिसत आहे.