रविंद्र तांगडे व सोहल शेख शिवसेनेत! हातात बांधले शिवबधंन

रविंद्र तांगडे व सोहल शेख शिवसेनेत! हातात बांधले शिवबधंन
रविंद्र तांगडे व सोहल शेख शिवसेनेत! हातात बांधले शिवबधंन

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- शहराच्या राजकारणात मोठी हालचाल घडवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र तांगडे आणि माजी नगरसेवक सोहल शेख यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

मातोश्री येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याला स्वतः पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्यांनी सर्व नवागत कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करत सांगितले की, “शिवसेना ही सामान्य माणसाच्या न्यायासाठी लढणारी संघटना आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाला या घरात स्थान आहे.”

या प्रसंगी शिवसेना नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपनेते विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरप्रमुख राजू वैद्य आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रविंद्र तांगडे यांनी सांगितले की, “उद्धवसाहेबांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. संभाजीनगरातील जनतेच्या समस्यांवर लढा देण्यासाठी आम्ही आता शिवसेनेच्या विचारधारेतून काम करू.”

सोहल शेख यांनीही म्हटले की, “शिवसेना म्हणजे मराठी अस्मितेचा किल्ला. या किल्ल्याला अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कार्य करू.”

या प्रवेशामुळे संभाजीनगरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेला या नव्या जोडणीनंतर स्थानिक पातळीवर अधिक बळ मिळणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

संभाजीनगरच्या राजकीय पटावर ‘मातोश्री’चा झेंडा आता आणखी उंच फडकणार, अशी चर्चा रंगली आहे. 🟧