मोठा बदल! उद्याची मतमोजणी रद्द; आता २१ डिसेंबरला उघड होणार उमेदवारांचे नशीब, हायकोर्टाचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
नागपुर दि २ :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय आज समोर आला आहे. आधी ठरल्याप्रमाणे उद्या होणारी मतमोजणी रद्द करण्यात आली असून आता २१ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाला हे निर्देश हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत.
राज्यातील काही भागांत आज मतदान पार पडत आहे, तर काही नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घ्यावी, या मागणीसाठी दाखल झालेल्या याचिकेवर आज खंडपीठाने सुनावणी घेऊन निर्णय जाहीर केला.
आता सर्वांच्या नजरा २१ डिसेंबरवर खिळल्या आहेत, कारण याच दिवशी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.