मुसळधार पावसामुळे 09 ठिकाणी साचले पाणी, हर्सूल तलाव ओव्हरफलो, खाम नदीला पूर

मनपा यंत्रणा सतर्क, प्रशासकांनी केली पाहणी

मुसळधार पावसामुळे 09 ठिकाणी साचले पाणी, हर्सूल तलाव ओव्हरफलो, खाम नदीला पूर
मुसळधार पावसामुळे 09 ठिकाणी साचले पाणी, हर्सूल तलाव ओव्हरफलो, खाम नदीला पूर

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :- काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील 09 ठिकाणी पावसाचे पाणी सचण्याचे तर दोन ठिकाणी झाड पडल्याचे कॉल अग्निशमन विभागांना प्राप्त झाले आहे.

 काल संध्याकाळी मुसळधार पावसाचा अनुमान कळताना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी काल संध्याकाळीच महानगरपालिका यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. 

रात्रभर सुरू असलेला पावसात एकूण 09 ठिकाणी पाणी साचला तर दोन ठिकाणी झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान काल रात्र पासून या कॉलवर आहे आणि बरेच ठिकाणी पाणी खाली करण्याची कारवाई सुरू आहे तर काही ठिकाणी पाणी काढल्या गेल्याची माहिती आहे.

काल रात्री 10 वाजेपासून ते आज सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या फायर कॉल मध्ये जालान नगर येथे गौरव रेसिडेन्सी, बीड बायपास येथे कांगे पेट्रोल पंप , मयूरबन कॉलनी पद्मावती अपार्टमेंट, रेल्वे स्टेशन राहुल नगर गल्ली क्रमांक 01, बीड बायपास हॉटेल निशांत पार्क मागे व्हीनस हाऊसिंग सोसायटी, कांचनवाडी येथे अग्रसेन भवन विद्यामंदिरच्या बाजूला अंडरग्राउंड दुकानात, राहुल नगर येथे रेवती सोसायटी, टीव्ही सेंटर येथे हिंदुस्थान मेडिकल च्या बाजूला, भगीरथ नगर देवगिरी स्कूल समोर अपार्टमेंट मध्ये पाणी साचल्याचे कॉल प्राप्त झाले. कॉल प्राप्त होताच अग्निशमन दल आणि संबंधित वॉर्ड कार्यालय यंत्रणा हरकतीत आली आणि साचलेले पाणी पंपिंग करून काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. याशिवाय नक्षत्रवाडी आणि एन-5 जळगाव रोड या दोन ठिकाणी झाडे पडल्याची माहिती मिळताच तावरीत रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागामार्फत देण्यात आली आहे.

 *प्रशासकांनी केली पाहणी* 

काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील एकूण 09 ठिकाणी पाणी साचले यानिमित्त प्रशासक जी श्रीकांत यांनी आज सकाळी 07 वाजता जालानगर, राहुल नगर आणि कांचनवाडी या भागाची पाहणी केली आणि स्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर श्री नंदकुमार घोडेले, उप आयुक्त नंदकिशोर भोंबे आणि वॉर्ड अभियंता काजी जावेद यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रशासक महोदय यांनी यंत्रणेला साचलेला पाणी खाली होईपर्यंत माघार न घेण्याचे आणि नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

 *हर्सूल तलाव भरला, खाम नदीला पूर* 

काल रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे हर्सूल तलाव पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहे यामुळे खाम नदीला पूर आलेला आहे. यानिमित्त खाम नदी काठाच्या जवळ राहणारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा महानगरपालिका तर्फे देण्यात आलेला आहे.