"मुख्यमंत्र्यांसाठी बिर्याणीचा न्योता!इम्तियाज जलील यांचा मासबंदीला ‘चविष्ट’ विरोध"

"मुख्यमंत्र्यांसाठी बिर्याणीचा न्योता!इम्तियाज जलील यांचा मासबंदीला ‘चविष्ट’ विरोध"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :– स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मासविक्रीवर बंदी घालण्याचा आदेश निघाल्यानंतर, माजी खासदार आणि AIMIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अनोख्या पद्धतीने विरोध नोंदवला. त्यांनी स्वतःच्या हाताने बिर्याणी तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना सोशल मीडियावरून थेट “बिर्याणी पार्टी”चे आमंत्रण दिले.

काय आहे प्रकरण?

१५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरात मास विक्री न करण्याचा आदेश जारी केला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी जलील यांनी आपल्या घरी बिर्याणी बनवून व्हिडिओ व फोटो शेअर केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांना व आयुक्तांना बिर्याणी चाखण्याचे खुले आमंत्रण दिले.

“खायचं काय, ठरवणार तुम्ही कोण?”

जलील म्हणाले,

> “आपण प्रत्येकांच्या सणांचा सन्मान करतो. पण लोक काय खावं किंवा न खावं हे ठरवण्याचा अधिकार कुणालाही नाही. देशाच्या स्वातंत्र्यदिनीच माझ्या खाण्यावर निर्बंध लादणे ही स्वातंत्र्याची गळचेपी आहे.”

त्यांनी पुढे विचारले,

> “स्वातंत्र्य दिन साजरा करतो म्हणजे माझ्या थाळीतलं स्वातंत्र्य हिरावून घेणार का? हे लोकशाहीत योग्य नाही.”

सोशल मीडियावर चर्चा रंगली

जलील यांच्या या ‘बिर्याणी विरोधा’ची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी विरोध दर्शवला. मात्र, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुरू झालेली ‘बिर्याणी चर्चा’ शहरात चांगलीच रंगली आहे.

महाराष्ट्र वाणी निष्कर्ष:

राजकारणात नेहमी भाषणं, आंदोलनं दिसतात; पण यावेळी ‘बिर्याणी पार्टी’मुळे वाद, चव आणि विरोध सगळं एका ताटात आलं!