मुंबईत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांचा सत्कार
✍️ महाराष्ट्र वाणी
मुंबई दि १८ :– मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय मुश्ताक अंतुले यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी उम्मीद फाऊंडेशन मुंब्रा अध्यक्ष परवेझ फरीद, संचालक हमीद पटेल, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परिषदेचे सचिव साजिद पटेल तसेच काँग्रेस माथाडी कामगार मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली उपस्थित होते.
माननीय मुश्ताक अंतुले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असून शिक्षण, रोजगार व आर्थिक मदतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या वेळी साजिद पटेल यांनी शैक्षणिक कर्ज योजनांना गती देण्याचे आवाहन केले. तसेच ज्यांना महामंडळाने कर्ज दिले नाही आणि त्यांच्या जमिनीवर भोज टाकण्यात आले आहे, अशा प्रकरणांमध्ये भोज हटवण्याचे आदेश प्रत्येक जिल्हा व्यवस्थापकांना देण्याबाबत सूचना मांडल्या.
या सत्कार सोहळ्यामुळे समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महामंडळ करत असलेल्या कार्याला नवीन प्रेरणा मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी अंतुले साहेबांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.