महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये आक्रमक भूमिका "शेतकऱ्यांच्या विरोधात वागतायत कोकाटे; राजीनामा घ्या!" – महाविकास आघाडीची केंद्राकडे ठाम मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

नवी दिल्ली, 22 जुलै :- आज महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची नवी दिल्लीत भेट घेऊन महाराष्ट्रातील कृषी धोरणांची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि राज्यातील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त भूमिकेबाबत चिंता व्यक्त केली.

शिष्टमंडळाने कोकाटे यांच्या अरेरावीपूर्ण, असंवेदनशील वक्तव्यांचा, तसेच विधानसभा कार्यवाहीदरम्यान रम्मीसारख्या जुगारात सहभागी होण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत, हे प्रकार शेतकरी समाजाचा अपमान करणारे असल्याचे स्पष्ट केले.

महाविकास आघाडीने केंद्रीय कृषी मंत्र्यांसमोर पुढील दोन प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या:

🔹 माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा

🔹 शेतकऱ्यांच्या व्यथा समजणाऱ्या संवेदनशील मंत्र्याची नेमणूक

"शेतकऱ्यांचा सन्मान राखणे म्हणजेच लोकशाही बळकट करणे," असा ठाम पवित्रा घेत महाविकास आघाडीने हे प्रकरण संसदेच्या आगामी अधिवेशनातही जोरदारपणे मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही लढाई थांबणार नाही!