महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

१६ जिल्ह्यांमध्ये महिलांना संधी

महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, दि.१२ :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या आरक्षणाची यादी जाहीर केली आहे. विविध प्रवर्गांना आरक्षण देत महिलांसाठी तब्बल १६ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे.

ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये महिलांना मोठी संधी मिळाली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग या सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळाल्याने सामाजिक न्यायाचे तत्व पाळले असल्याचे दिसून येते.

जिल्हानिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :

ठाणे - सर्वसाधारण (महिला)

पालघर - अनुसूचित जमाती

रायगड - सर्वसाधारण

रत्नागिरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सिंधुदुर्ग - सर्वसाधारण

नाशिक - सर्वसाधारण

धुळे - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

नंदूरबार - अनुसूचित जमाती

जळगांव - सर्वसाधारण

अहमदनगर - अनुसूचित जमाती (महिला)

पुणे - सर्वसाधारण

सातारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सांगली - सर्वसाधारण (महिला)

सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

कोल्हापूर - सर्वसाधारण (महिला)

छ. संभाजीनगर - सर्वसाधारण

जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

बीड - अनुसूचित जाती (महिला)

हिंगोली - अनुसूचित जाती

नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग

धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

लातूर - सर्वसाधारण (महिला)

अमरावती - सर्वसाधारण (महिला)

अकोला - अनुसूचित जमाती (महिला)

परभणी - अनुसूचित जाती

वाशिम - अनुसूचित जमाती (महिला)

बुलढाणा - सर्वसाधारण

यवतमाळ - सर्वसाधारण

नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग

वर्धा - अनुसूचित जाती

भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग

गोंदिया - सर्वसाधारण (महिला)

चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)

गडचिरोली - सर्वसाधारण (महिला)

ठळक मुद्दे :

३४ जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपदासाठी आरक्षण यादी जाहीर

१६ जिल्ह्यांमध्ये महिलांना मोठी संधी

सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व

👉 महाराष्ट्र वाणी पोर्टलवर अशा आणखी अपडेट्ससाठी जोडलेले राहा!