महापौर समीर राजूरकर यांचा ‘वेलकम संस्था’तर्फे सत्कार, विकास मागण्यांचे निवेदन सादर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १८ —
महानगरपालिकेच्या महापौरपदी मा. श्री. समीर भैया राजूरकर यांची निवड झाल्याबद्दल ‘वेलकम संस्था’तर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यानिमित्ताने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी ‘वेलकम संस्था’चे अध्यक्ष पठाण जफर, सचिव पठाण अझर, तसेच रईस शेख व फरहान शेख उपस्थित होते. शहराच्या विकासाला गती देणे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवणे हा संस्थेचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये १४,०९८ पथविक्रेत्यांचे प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करून निवडणूक प्रक्रिया तातडीने राबविणे, मनपा शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रमाचा विस्तार करणे, स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना व ‘आपला दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबविणे यांचा समावेश आहे.
तसेच महिला कल्याणासाठीच्या ६५ योजनांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद २५ लाख रुपयांपर्यंत वाढविणे आणि प्रत्येक प्रभागात ओपन जिमची उभारणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महापौर समीर राजूरकर यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करून टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या अभ्यासू व नियोजनबद्ध नेतृत्वाखाली शहराचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
✨ शहराच्या विकासासाठी नागरिक संघटनांचा पुढाकार ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे!