महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग : मिसरवाडी प्रभागात BRSP जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग : मिसरवाडी प्रभागात BRSP जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग : मिसरवाडी प्रभागात BRSP जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३१ :- आगामी महानगरपालिका निवडणुकीत संघटित तयारीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (BRSP) ने मिसरवाडी प्रभागात जनसंपर्क कार्यालय उघडले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. ३१ ऑगस्ट २०२५) BRSP प्रदेश महासचिव अरविंद कांबळे यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी जिल्हा महासचिव सलमान पठाण (सरकार) यांनी प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून पक्षाचा जनाधार वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BRSP कार्यकर्ते पूर्ण ताकदीने लोकांपर्यंत पोहोचतील, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाला प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. यात प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, युवा जिल्हाध्यक्ष अनामी मोरे, शहराध्यक्ष पश्चिम नवाब पटेल, शहराध्यक्ष (अल्पसंख्यांक) हाफिस अश्रफ, तालुका अध्यक्ष गंगापूर मनोज साळवे, पश्चिम शहर उपाध्यक्ष राहुल जाधव, शहर महासचिव रमेश साळवे, वार्ड अध्यक्ष संतोष इंगळे, युवा नेते आमेर शेख आदींचा समावेश होता.

स्थानिक नागरिक, महिला व युवकांनीही उद्घाटन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पक्षाच्या विचारधारेसह संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.

“या कार्यालयाच्या माध्यमातून मिसरवाडी प्रभागातील लोकांशी थेट संपर्क वाढेल आणि महापालिका निवडणुकीत BRSP अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.”