महानगरपालिकेच्या जागेवरील ४००० स्वे.फुटाचे अतिक्रमण जमिनदोस्त
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.२३ जुलै :- महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज हर्सूल परिसरातील अनधिकृत बांधकाम अतिक्रमणे जमिनदोस्त केली. छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या शाळे लगत जवळपास ४००० स्वे.फूट जागेवर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमणे केले होती.सदर अतिक्रमणे काढणे बाबत त्यांना यापूर्वी सूचना देण्यात आली होती. परंतु त्यांनी या सूचनेचे पालन केले नाही म्हणून संबंधित लोकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत नोटीस देण्यात आली होती. त्या नोटीसला त्यांनी मा. महानगरपालिका न्यायालयात दावा दाखल केला होता दावा दाखल झाल्याने याबाबत मनपा न्यायालय यांनी सदर जागा आणि महानगरपालिकेची असून सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याने या ठिकाणी कारवाई करण्याची मा. न्यायालयाने आदेश दिले.
या अनुषंगाने झोन क्रमांक चार चे सहाय्यक आयुक्त अशोक गिरी यांनी याबाबत मा. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार मा. अतिरिक्त आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी आज सकाळी अतिक्रमण हटाव पथकासह हजर होऊन सदर कारवाई केली.
आजच्या या कारवाईमध्ये आरसीसी मध्ये झालेले बांधकाम, लोखंडी पत्र्याचे शेड निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली.या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आधुनिक पद्धतीचे व्यायाम शाळा बांधण्यात येत आहे. तसेच या बाजूला असलेल्या किरकोळ स्वरूपाचे अतिक्रम ही काढण्यात आलेले आहे. सदर कारवाई मा. आयुक्त यांचे आदेशानुसार अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अशोक गिरी, संजय सुरडकर ,अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद,रविंद्र देसाई, सोमशंकर मेत्रे,नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व इतर कर्मचारी यांनी पार पाडली.