महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मां. महापौर व उप महापौर यांचा सत्कार
संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दोन अनाथ आश्रमास ५० हजार रुपयांची आर्थिक मदत
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १७ :- महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज मां. महापौर व उप महापौर यांचा सत्कार करण्यात आला.
आज संघटनेच्या वतीने मां.महापौर समीर राजुरकर यांना भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेच्या वतीने मां.महापौर महोदय यांच्या हस्ते वसंतराव नाईक बालगृह स्वराज नगर मुकुंदवाडी परिसर या संस्थेस रु.२५००० आर्थिक मदत देण्यात आली.
तसेच मां.उप महापौर राजेंद्र जंजाळ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मां.उप महापौर यांच्या हस्ते संघटनेच्या वतीने भगवान बाबा बालिका आश्रम यांना रु.२५००० आर्थिक मदत देण्यात आली.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष संजय सुरडकर,सचिव अपर्णा थेटे, सल्लागार विजय पाटील ,उपाध्यक्ष सविता सोनवणे,अभय प्रामाणिक ,अनिल तनपुरे,संजय चामले,संजय कोलते,श्रीकांत वैद्य ,भारत बिरारे,उदय मानवतकर,सह सचिव सतीश सौर,सय्यद जमशेद, सचिन भालेराव, तौसीफ अहमद, अनिल बोंडे,दीपक जावळे,अविनाश निकम ,ललित सूर्यवंशी आदी अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.