“मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही!” – इंजि. धनश्री तडवळकर यांचा केतकी चितळेवर संताप

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २५ जुलै :- अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त विधानावरून सध्या राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. “मराठी न बोलल्याने भोक पडतात का?” या तिच्या अश्लील आणि मराठी विरोधी वक्तव्यावर मराठी भाषा प्रेमींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून, इंजि. धनश्री तडवळकर यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
“मराठी ही फक्त भाषा नाही — ती महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे,” असं ठामपणे सांगत तडवळकर म्हणाल्या, “तुझ्यासारख्यांनीच या मातीतून नाव कमावलं आणि आता तिचाच अपमान करताय? हे वर्तन अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, तर ११ कोटी मराठी जनतेच्या आत्मसन्मानावर घाला आहे.”
तडवळकर यांनी स्पष्ट केलं की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आज संघर्षाची गरज आहे, आणि अशा वेळी अशी विधानं धक्कादायक आणि दुर्दैवी आहेत.
त्यांनी पुढे म्हटलं की –
“मराठी ही भाषा नाही, ती सहाशे वर्षांची परंपरा, संतवाङ्मय, विचार आणि संस्कृती आहे. ती हिणवण्याचा अधिकार कुणालाही नाही. भाषेचा बाजार मांडू नका – ती आत्म्याची अभिव्यक्ती आहे!”
केतकी चितळे हिने प्रसिद्धी मराठी मालिकांमधूनच मिळवली, आणि आता तीच भाषा हिणवणं म्हणजे ‘नमकहरामीपणा’ असल्याचंही त्या म्हणाल्या.
“मराठी न बोलणं गुन्हा नाही — पण तिचा अपमान करणं कधीही माफ केला जाणार नाही,” — असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
मराठीवर घाला नाही, मराठीस अभिमान हवा!