मनपा मुख्यालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

महाराष्ट्र वाणी न्युज
दि२१ जून :- छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
मनपा मुख्यालयं येथे मां.आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ०७.०० वाजता योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका व छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे योग शिबिर आयोजित करण्यात आले होते.या वेळी मा.उप आयुक्त नंदकिशोर भोंबे,सहायक आयुक्त संजय सुरडकर,सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू,वैद्यकीय अधिकारी डॉ बालकृष्ण राठोडकर,माहिती व जनसंपर्क विभागाचे रविंद्र खरात,संतोष कोठाळे,क्रीडा अधिकारी संजीव बालाया, आदी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी योग संस्थेच्या योगा प्रशिक्षक राणी विसपुते,गायत्री पारसेवार ,मीनाक्षी हजारे यांनी विविध योग आसनांचे योग प्रशिक्षण दिले.यावेळी त्यांचा महानगरपालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
*मनपा हर्सूल केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळेत योग दिवस साजरा*
योग साधना केंद्र, भारतीय योग संस्थान, नवी दिल्ली यांच्या साधकांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतले.विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते.
शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक जगन्नाथ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक लक्ष्मण महालकर, अंकुश लाडके, संजय कुलकर्णी संजय मोकळे,सुनील हिरेकर, रमेश वाडेकर, विशाल बाविस्कर, शिक्षिका सहाने ,मोटे , वैष्णव बांबर्डे ,मस्के ,शेळके , कन्नर , शिंदे ,दांडगे ,चव्हाण यांनी प्रयत्न केले.