मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, हवाई प्रवास व कर्ज प्रक्रियेतही सवलती!

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १२ :- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
🔹 १५ हजार पोलीस शिपाई भरतीला हिरवा कंदील
महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे १५ हजार शिपाई पदांसाठी २०२४-२५ या वर्षी भरती प्रक्रिया राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२२ व २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एकदाच संधी देण्यात येणार आहे.
🔹 रास्त भाव दुकानदारांना मार्जिनमध्ये वाढ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य व साखर वितरित करणाऱ्या दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना १५० ऐवजी १७० रुपये मार्जिन मिळणार आहे.
🔹 सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवास स्वस्त होणार
उडान योजनेच्या धर्तीवर सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी एक वर्षाकरिता प्रति आसन ३,२४० रुपयांच्या व्हायअबिलिटी गॅप फंडिंगला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील हवाई प्रवासाचे दर कमी होणार आहेत.
🔹 मागासवर्ग विकास महामंडळांच्या कर्ज प्रक्रियेत सुलभता
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध कर्ज योजनांतील जामिनदाराच्या अटी सुलभ करण्यात आल्या आहेत. तसेच शासन हमीची मुदत ५ वर्षांनी वाढविण्यात आली आहे, ज्यामुळे लघुउद्योजकांना कर्जप्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.