"भारताचे भविष्य क्रीडांगणात घडतेय!" ईशान्य भारतातील खेळाडूंना बळ देण्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा आगरतळा दौरा

महाराष्ट्र वाणी न्युज 

आगरतळा, त्रिपुरा २४ जून :- केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी 'पूर्वोत्तर संपर्क सेतू' उपक्रमाअंतर्गत त्रिपुरातील आगरतळा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटरला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी केंद्रातील क्रीडा प्रशिक्षण, खेळाडूंच्या निवास आणि आहार सुविधांचा सखोल आढावा घेतला.

विशेषतः जिम्नॅस्टिक्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या केंद्रातील युवा खेळाडूंशी थेट संवाद साधून श्रीमती खडसे यांनी त्यांच्या प्रेरणा, अडचणी जाणून घेतल्या. दीर्घकालीन अ‍ॅथलीट विकास (LTAD) संकल्पनेवर भर देत त्यांनी सांगितले की, “या तरुण पिढीमध्ये भारताचे भविष्य दडलेले आहे. केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

श्रीमती खडसे यांनी "खेलो इंडिया" व SAI सारख्या उपक्रमांद्वारे त्रिपुराच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याची ग्वाही दिली. भारताच्या 'India@2047' या दीर्घकालीन विकास दृष्टिकोनाचा हा दौरा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.