भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर युथ मोव्हमेंट ऑफ महाराष्ट्र आक्रमक — मनपा समोर तीव्र आंदोलन, मृत बालकाच्या कुटुंबाला १० लाख मदतीची मागणी

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर युथ मोव्हमेंट ऑफ महाराष्ट्र आक्रमक — मनपा समोर तीव्र आंदोलन, मृत बालकाच्या कुटुंबाला १० लाख मदतीची मागणी
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर युथ मोव्हमेंट ऑफ महाराष्ट्र आक्रमक — मनपा समोर तीव्र आंदोलन, मृत बालकाच्या कुटुंबाला १० लाख मदतीची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि ३० :- अलीकडच्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास चव्हाट्यावर आला आहे. विविध भागांत कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जाफर गेट परिसरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत लहानगा अरमानचा मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत आज युथ मोव्हमेंट ऑफ महाराष्ट्रने मनपा कार्यालयासमोर आंदोलन केले.

आंदोलनकर्त्यांनी मृत बालकाच्या कुटुंबाला तात्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्याची आणि मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, तसेच लसीकरण, आश्रय आणि नियंत्रणासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून स्थायी धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. कुत्र्यांच्या चाव्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी, प्रत्येक दाताच्या जखमेसाठी १० हजार रुपये आणि खोल जखम झाल्यास अतिरिक्त २० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात केली आहे.

या आंदोलनात महिला आणि बालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

या प्रसंगी मुसद्दीक अहमद, सलमान सिद्दीकी, आदील मदनी, मुश्ताक खान, सय्यद तन्वीर शाह, फहाद रशीद खान, मोहम्मद शोएब शेख, जाहिद शुलारान, सालेह आमेर, फैसल अमान खान, शरजील खान, उमर सिद्दीकी, अल्तमश हाश्मी, अब्दुल मुकीद, मुजाहिद अब्दुल्ला, मसरुर खान, मोहसीन खान, जावेद कुरेशी, मतीन पटेल तसेच विविध संघटना आणि जमात-ए-इस्लामी हिंद महिला विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

🟠 शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस कारवाईची मागणी, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशारा!