“‘भटकणाऱ्या आत्म्यांमुळे मनपाला ग्रहण?’ मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर इम्तियाज जलीलांचा कडाडून प्रतिकार!”

“‘भटकणाऱ्या आत्म्यांमुळे मनपाला ग्रहण?’ मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर इम्तियाज जलीलांचा कडाडून प्रतिकार!”

✍️ महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ महानगरपालिकेच्या जागेबाबत राजकारण तापू लागले असून, मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. “महानगरपालिकेची जागा पूर्वी कब्रस्तान होती, मुडदे गाडण्याची जागा होती. त्यामुळे या ठिकाणी बेचैन आत्मे भटकतात आणि म्हणूनच मनपाला ग्रहण लागले आहे,” असे वक्तव्य करत शिरसाट यांनी मनपा इमारतीची जागा बदलण्याचा सल्ला दिला.

या वक्तव्यावर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार पलटवार करत शिरसाट यांना सवाल केला आहे. “गेल्या 30-35 वर्षांपासून येथे महानगरपालिकेचा कारभार सुरू आहे, तेव्हा ही जागा कब्रस्तान होती हे दिसले नाही का?” असा टोला त्यांनी लगावला.

तसेच, “जागा अपुरी पडत असेल तर शहरातील कचरा डेपो हटवून त्या ठिकाणी नवीन मनपा इमारत उभारावी, अशी आमची मागणी आहे,” असेही जलील यांनी स्पष्ट केले. त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य टाळावे, असा अप्रत्यक्ष सल्लाही दिला.

या मुद्द्यावरून शहरात राजकीय वातावरण तापले असून, नागरिकांमध्येही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मनपा इमारतीची जागा बदलावी की विद्यमान ठिकाणीच सुधारणा करावी, यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

👉 “अंधश्रद्धा की वास्तव? मनपा जागेच्या वादातून राजकारणाला नवी दिशा!”