भगतसिंगनगर परिसरातील रस्ते विकासाला गती – १.१५ कोटींच्या कामांचे आ. प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते भूमिपूजन

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ जुलै:- मध्य विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. २ मधील भगतसिंगनगर परिसरात ₹१.१५ कोटींच्या रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन दिनांक २२ रोजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या अंतर्गत हरसिद्धी मातानगर, दत्तनगर व सदगुरूनगर येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

स्थानिक नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर या कामांना मंजुरी मिळाली आहे. रस्ते सुधारल्यामुळे परिसरातील रहिवाशांना वाहतुकीची सोय होणार असून पावसाळ्यातील चिखल व अडचणींमधून मुक्तता मिळणार आहे.

या कार्यक्रमाला उपशहरप्रमुख राजू अहिरे, रमेश सूर्यवंशी, काशिनाथ बकले, गणेश पवार, माजी नगरसेवक गंगाधर ढगे, किशोर नागरे, महिला आघाडीच्या शहरप्रमुख संगीता बोरसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. भविष्यात आणखी अनेक विकासकामे राबवली जातील," असे आश्वासन यावेळी आमदार जैस्वाल यांनी दिले.

 रस्त्यांच्या मजबुतीने विकासाची वाटचाल ठाम!