"बूट विकणाऱ्या पासून IT सम्राटांपर्यंत… हे आहेत भारतातील 5 सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योजक कुटुंब!

"बूट विकणाऱ्या पासून IT सम्राटांपर्यंत… हे आहेत भारतातील 5 सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योजक कुटुंब!

महाराष्ट्र वाणी न्युज विषेश 

भारतात विविध समाजघटकांनी मेहनतीच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर यश मिळवलं आहे. त्यात मुस्लिम उद्योजकांचं योगदान विशेष महत्त्वाचं मानलं जातं. काहींनी आयटी क्षेत्रात झेंडा रोवला, तर काहींनी हेल्थकेअर आणि रिटेलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली. आज आपण अशाच पाच मुस्लिम कुटुंबांची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी केवळ संपत्ती नाही, तर समाजासाठीही आपलं योगदान दिलं आहे.

🔹 अझीम प्रेमजी

विप्रोचे संस्थापक आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज उद्योजक अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती ₹1 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र ते आपल्या उदार दातृत्वासाठीही ओळखले जातात. आतापर्यंत त्यांनी ₹9,700 कोटींपेक्षा जास्त रक्कम समाजकार्यासाठी दिली आहे. ते देशातील सर्वात मोठ्या दात्यांपैकी एक आहेत.

🔹 एम.ए. युसुफ अली

लुलू ग्रुप इंटरनॅशनलचे संस्थापक एम.ए. युसुफ अली यांचे मुख्यालय अबू धाबीमध्ये असले तरी त्यांचा व्यवसाय भारतासह अनेक देशांमध्ये विस्तारलेला आहे. ₹65,150 कोटींपेक्षा जास्त संपत्तीसह ते आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखले जातात.

🔹 युसुफ हमीद

सिप्ला कंपनीचे प्रमुख आणि विज्ञानविषयक सेवेसाठी प्रसिद्ध असलेले युसुफ हमीद यांनी हजारो गरजू रुग्णांना परवडणाऱ्या औषधांच्या माध्यमातून मदत केली आहे. ₹21,000 कोटींच्या मालमत्तेसह त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.

🔹 रफिक मलिक

फुटवेअर साम्राज्याचे निर्माते रफिक मलिक यांनी 'मेट्रो', 'मोची', 'वॉकवे' सारखे ब्रँड उभे करून ₹17,160 कोटींचा व्यवसाय उभारला आहे. रस्त्यावर बूट विकणारा एक सामान्य माणूस ते रिटेल किंग बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

🔹 डॉ. आझाद मूपेन

डॉक्टर म्हणून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय हेल्थकेअर नेटवर्क उभारणाऱ्या डॉ. मूपेन यांची मालमत्ता आज ₹8,300 कोटींच्या घरात आहे. एस्टर डीएम हेल्थकेअरच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे.

या यशोगाथा म्हणजे केवळ आर्थिक संपत्तीची नव्हे, तर समाजाशी असलेल्या नात्याची जाणीव आणि जबाबदारीची जिवंत उदाहरणं आहेत.

 अशा प्रेरणादायी बातम्यांसाठी जोडलेले रहा...!