"फरहत देशमुख यांच्या हस्ते गरजूंना राशनकार्ड वाटप – चेहऱ्यावर फुलली आनंदाची लहर"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ९ ऑगस्ट :– "जेव्हा आम्ही राशनकार्ड शिबिर भरवलं, तेव्हा एकच उद्देश होता – गरजूंना मदत करणं" अशा भावना समाजसेविका फरहत देशमुख यांनी व्यक्त केल्या.
त्या म्हणाल्या की, आज जेव्हा त्या सर्वांचे तयार झालेल्या राशनकार्ड आमच्या हातात आले आणि आम्ही स्वतःच्या हातांनी ते गरजूंना सुपूर्द केले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आमच्या हृदयात कायमचं कोरलं गेलं.
त्यांची समस्या दूर करणं हे केवळ एक काम नसून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. "इन्सानियतच्या सेवेचा भागीदार होणं आमच्यासाठी गौरव आहे. इन्सानाच्या कामी येणं, इन्सानाची सेवा करणं हाच आमचा ध्यास आहे," असेही फरहत देशमुख यांनी सांगितले.