"पडळकरांच्या अपशब्दांवर राष्ट्रवादी संतापला; सिडको पोलीस ठाण्यात धडक!"

"पडळकरांच्या अपशब्दांवर राष्ट्रवादी संतापला; सिडको पोलीस ठाण्यात धडक!"
"पडळकरांच्या अपशब्दांवर राष्ट्रवादी संतापला; सिडको पोलीस ठाण्यात धडक!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १८ :- भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने माजी मंत्री जयंत पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी अत्यंत खालच्या पातळीवरील अपशब्द वापरत आहेत. आई-वडिलांवर केलेल्या वाईट वक्तव्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी सिडको पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. पडळकरांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

👉 महाराष्ट्रवाणी सोबत राहा, प्रत्येक घडामोडीची अचूक बातमी आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी!