नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट सज्ज – राष्ट्रवादी भवनात तयारी बैठक उत्साहात

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि. ११ :– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने येत्या १५ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर ज्वलंत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार शरदचंद्राजी पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक मोर्चा निघणार आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगरात पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्य प्रवक्ते भिमराव हत्तीअंभीरे, शहराध्यक्ष ख्वाजा भाई, सर्व तालुकाध्यक्ष, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून मोर्चा ऐतिहासिक आणि सरकारला धडकी भरवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

👉 “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा हेच आमचे ध्येय आहे आणि हा आक्रोश मोर्चा महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज ठरणार आहे”, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील यांनी व्यक्त केले.

 शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीचा हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरणार आहे.