नगर परिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या सोमवारी जिल्हाभरात बैठका! शिवसेना नेते चंद्रकांत खैरे घेणार पदाधिकार्‍यांकडून आढावा

नगर परिषद निवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या सोमवारी जिल्हाभरात बैठका! शिवसेना नेते चंद्रकांत खैरे घेणार पदाधिकार्‍यांकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ नोव्हेंबर :

आगामी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक तयारीला वेग दिला आहे. त्याच्या अनुषंगाने सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे हे स्थानिक पदाधिकारी, निरीक्षक आणि शिवसैनिकांकडून निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेणार आहेत.

या बैठकींना सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि निवडणुकीपूर्व रणनीती ठरविण्यासाठी या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बैठकांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे —

👉 सकाळी ११ वाजता गंगापूर,

👉 दुपारी १२.३० वाजता वैजापूर,

👉 दुपारी ३ वाजता कन्नड,

👉 आणि संध्याकाळी ५ वाजता खुलताबाद येथे बैठका पार पडणार आहेत.

या बैठकींना शिवसेना उपनेते सुभाष पाटील, माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहसंपर्कप्रमुख विजयराव साळवे, अनिल चोरडीया, माजी महापौर सुदाम सोनवणे, शिक्षक सेनेचे पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, विजय वाघमारे, हिरालाल सलामपुरे, श्रीरंग आमटे पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे, विरभद्र गादगे, अविनाश कुमावत, विनोद सोनवणे, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, दिग्विजय शेरखाने, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, संजय मोटे, सचिन वाणी, राजू वरकड, उपशहरप्रमुख सुरेश कर्डिले, प्रमोद ठेंगडे पाटील, नरेश मगर, युवासेनेचे उमेश मोकासे, विठ्ठल डमाळे, सरचिटणीस किरण तुपे, तसेच महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, सुनिता देव आणि आशा दातार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या जिल्हास्तरीय बैठकींतून शिवसेनेची आगामी नगर परिषद निवडणुकांसाठीची रणनिती आणि संघटनात्मक भूमिका स्पष्ट होणार असल्याची चिन्हे आहेत. पक्षाच्या गोटात यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“जनतेशी थेट संवाद आणि संघटनेला गती” — शिवसेनेच्या या बैठका आगामी निवडणुकीचा पाया ठरणार, अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेनेचा निवडणूक मोड ऑन