नक्षञवाडी ते रेल्वे स्टेशन ब्रीज दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ३६२ अतिक्रमण काढले
* आज कारवाई नाही** आज दि २ जुलै रोजी पुरता अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई होणार नाही, अशी माहिती श्री वाहूळे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर दि २ जुलै: दिनांक १ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि नियंत्रण अधिकारी अतिक्रमण विभाग संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत मनपा हद्द नक्षञवाडी ते रेल्वे स्टेशन ब्रीज दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ३६२ एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॅाटेल,लॅाज,दुकाने,शेड,कंपाऊंड,ओटे,गॅरेज,वॅाशिंग सेंटर,कमान,जाहिरात फलक,इ. निष्कासित करण्यात आले आहेत.
सदर कारवाई मध्ये महानगरपालिकेच्या २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तर पोलीस विभागाचे १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी १० जेसीबी,२ पोकलॅन,१० टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने,२ अग्निशमन बंब,२ इलेक्ट्रिक हायड्रॅालीक वाहने इ. वाहनांचा समावेश होता.
सदरील कारवाई मध्ये नगररचना विभागाचे उप संचालक मनोज गर्जे,यांञिकी विभागाचे अमोल कुलकर्णी, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे,सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम,प्राजक्ता वंजारी,अर्चना राजपूत,रमेश मोरे,संजय सुरडकर,अशोक गिरी,सय्यद समीउल्लाह,भारत बिरारे,राहूल जाधव,नईम अन्सारी
इमारत निरीक्षक कुणाल भोसले,शिवम घोडके,सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव,सय्यद मजहर अली, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज संवडकर,राहूल,शिवाजी लोखंडे व नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव हे कर्मचारी उपस्थित होते.