धनश्री वल्लम तडवळकर यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) मराठवाडा प्रदेश अध्यक्षा म्हणून निवड
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ५ :- राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून धनश्री वल्लम तडवळकर यांची मराठवाडा प्रदेश अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेसच्या (अर्वज) अध्यक्षा तथा राज्य प्रवक्ता मनाली भिलारे यांनी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही नियुक्ती जाहीर केली.
या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, पक्षासाठी आतापर्यंत दिलेल्या त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यतत्परतेने योगदान द्यावे, अशी अपेक्षा मनाली भिलारे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष, युवती संघटनेच्या राष्ट्रीय निमंत्रक सुप्रिया सुळे यांच्या विचारधारेचा प्रसार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत व्हावा, यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धनश्री वल्लम तडवळकर यांच्या या नियुक्तीबद्दल पक्षात उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.