दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राजीव गांधी जयंती साजरी
महाराष्ट्र वाणी न्युज
दर्यापूर (ता. अमरावती) दि २० :- दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाखळे, बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे, उपसभापती राजु पाटील कराळे, संचालक प्रभाकर पाटील तराळ, संचालक आसिफ खॉ पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून राजीव गांधी यांना अभिवादन केले.