"तरुणाई कृतिशील राहावी, वैचारिक प्रदूषण रोखा" – हर्षवर्धन सपकाळ; NSUI अध्यक्ष सागर साळुंखे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १३ :- : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत NSUI चे नवनियुक्त महाराष्ट्र अध्यक्ष सागर साळुंखे यांचा पदग्रहण सोहळा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, टिळक भवन, दादर येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
सोहळ्यात बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आजच्या तरुणाईसमोरील आव्हानांचा विशेष उल्लेख केला. “राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असताना युवकांनी केवळ घोषणाबाजी न करता कृतिशील राहणं ही आजची खरी गरज आहे. बेरोजगारीचे संकट गंभीर होत चालले आहे, त्यात सोशल मीडियामुळे वैचारिक प्रदूषण वाढत आहे. NSUI आणि युवक काँग्रेसने या परिस्थितीत विधायक कृतिकार्यक्रम राबवणे अत्यंत आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, “युवक काँग्रेस व NSUI च्या सोबत शेलार मामा म्हणून मी कायम उभा आहे. सर्वांनी एकजुटीने काम करून पक्ष बळकट करावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष NSUI वरुण चौधरी, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, माजी अध्यक्ष अमेर शेख, लेणी ताई जाधव, सुरभी द्विवेदी, क्रांतीवीर (राष्ट्रीय सचिव व प्रभारी महाराष्ट्र), श्री. कांता ग्वाला (राष्ट्रीय सचिव व प्रभारी महाराष्ट्र) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तरुणाईसमोरील बेरोजगारी आणि वैचारिक प्रदूषणाची जाणीव करून देत NSUI व युवक काँग्रेसला विधायक उपक्रमांची दिशा देणारे हर्षवर्धन सपकाळ यांचे मार्गदर्शन, नव्या नेतृत्वाला बळ देणारे ठरले.