डॉ. गफ्फार कादरींसह शेकडो जण राष्ट्रवादीत; अजीत पवारांचा अल्पसंख्याक प्रगतीचा रोडमॅप

डॉ. गफ्फार कादरींसह शेकडो जण राष्ट्रवादीत; अजीत पवारांचा अल्पसंख्याक प्रगतीचा रोडमॅप
डॉ. गफ्फार कादरींसह शेकडो जण राष्ट्रवादीत; अजीत पवारांचा अल्पसंख्याक प्रगतीचा रोडमॅप

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :– उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थितीत डॉ. गफ्फार कादरी आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अजीत पवार यांनी सर्वांचं मनापासून स्वागत करत, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

"शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालत आपण पक्ष अधिक सक्षम करणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत प्रत्येक कार्यकर्त्यानं सक्रिय सहभाग घ्यावा. एकजुटीनं पुढे जाऊन पक्षाला बळकट करूया," असं आवाहन पवारांनी यावेळी केलं.

अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी राज्य सरकारनं 'अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था' (MRTI) ही नव्यानं सुरू केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. "सर्व समाजघटकांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणं, तरुणांना परदेशात शिक्षणाच्या संधी मिळवून देणं यासाठी आम्ही आवश्यक त्या तरतुदी केल्या आहेत. नागपूर अधिवेशनात सर्व समाजघटकांसाठी आणखी निधी जाहीर करण्याचा माझा प्रयत्न असेल," असं पवारांनी स्पष्ट केलं.