जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर

महाराष्ट्र वाणी न्युज 

संभाजीनगर(औरंगाबाद), दि १६ :- निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंचायत समिती सभापती पदासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वैजापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्ग मध्ये महिला साठी राखीव असून, नागरिकांचा मागास प्रवर्गात दोन जागा यात सोयगाव आणि खुलताबाद असून यातील महिलांसाठी खुलताबाद आरक्षित आहे . सर्वसाधारण प्रवर्गामध्ये एकूण सहा पंचायत समितीचे सभापतीपदासाठी असून यामध्ये फुलंब्री सर्वसाधारण प्रवर्ग, गंगापूर सर्वसाधारण, पैठण सर्वसाधारण महिला प्रवर्ग, सिल्लोड सर्वसाधारण महिला सभापती पदासाठी राखीव, कन्नड सर्वसाधारण महिला, प्रवर्ग राखीव,छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण. प्रवर्गातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. अनन्या चव्हाण या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार दिनेश झांपले व नागरिक उपस्थित होते.