जावेद ज़मान खान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश — शहर सचिवपदाची जबाबदारी सोपवली
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ११ :- सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व जावेद ज़मान खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या दाखल झाले आहेत.
जावेद ज़मान खान हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य आणि राजकारणात सक्रिय असून, पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचा विशेष सहभाग आहे. ते ‘सवेरा एक्सप्रेस’ या वृत्तपत्राचे मुख्य संपादक (एडिटर-इन-चीफ) म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्याची आणि अनुभवाची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिजीत भैया देशमुख यांनी त्यांना पक्षाचे शहर सचिव पद बहाल केले. या वेळी देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला की, “जावेद ज़मान खान आगामी काळात समाज, क़ौम आणि जनतेच्या हितासाठी निष्ठेने कार्य करतील.”
या कार्यक्रमाला अहमद जलीस, सिद्दीकी सलीमुद्दीन, क़ाज़ी सफदर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
🟣 महाराष्ट्र वाणी — समाजाच्या आवाजासाठी सदैव तत्पर!