जळगावमध्ये डीआयजी दत्तात्रेय यांचा सत्कार; शांतता समितीच्या बैठकीत दिल्या सौहार्दपूर्णतेच्या सूचना!
जळगाव, दि. १ जुलै (प्रतिनिधी)
आज जळगाव येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात नाशिक विभागाचे डीआयजी दत्तात्रेय साहेब यांचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या प्रतिनिधींनी शाल, बुके देऊन स्वागत-सत्कार केला.
या वेळी बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी, समन्वयक अब्दुल करीम सालार, तसेच सैय्यद अयाझ अली, खालिद बाबा बागबान, इरफान सालार आणि अमजद पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
डीआयजी दत्तात्रेय यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, "जळगावसारख्या शांतताप्रिय शहरात आणि जुन्या मित्रमंडळींमध्ये पुन्हा एकदा भेट झाल्याचा मनस्वी आनंद झाला."
त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध समाजघटकांनी सहभाग घेतला. सर्व सण उत्साहात आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन डीआयजी दत्तात्रेय यांनी यावेळी केले.
समाजात सलोखा, सहकार्य आणि शांततेचा संदेश देणारी ही बैठक अत्यंत यशस्वी ठरली.
सौहार्द जपा, सण साजरे करा!