जळगावच्या प्रतिभाताई शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी जबाबदारी

जळगावच्या प्रतिभाताई शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी जबाबदारी

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई दि १ :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्षाच्या अधिकृत भूमिकेसाठी नवीन जबाबदारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जळगावच्या श्रीमती प्रतिभाताई शिंदे यांची प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीपत्रात तटकरे यांनी नमूद केले आहे की, पक्षाच्या ध्येय-धोरणांचा अभ्यास करून प्रसारमाध्यमांसमोर सकारात्मक भूमिका मांडावी. तसेच वक्तव्य करताना गैरसमज अथवा वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल प्रतिभाताई शिंदे यांचे पक्षाच्या वर्तुळात अभिनंदन होत आहे.