जळगाव मोब लिंचिंग प्रकरण : ८ आरोपी अटकेत, मकोका आणि एसआयटीची मागणी

जळगाव मोब लिंचिंग प्रकरण : ८ आरोपी अटकेत, मकोका आणि एसआयटीची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव दि १४ :- जळगाव जिल्ह्यातील सुलेमान यांच्या मोब लिंचिंग प्रकरणानंतर मुस्लिम समाजातील जबाबदार नागरिक, राजकीय व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी दिनांक १३ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

या भेटीमध्ये काँग्रेस नेते व जमीयत उलेमा महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी, माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार, अब्दुल अजीज सालार, माजी नगरसेवक इक्बाल पीरजादे, काँग्रेसचे जमीळ शेख, शाहिद मेंबर, सुन्नी जमातचे सय्यद अयाझ अली, बागवान जमातचे खालिद बाबा बागवान, काँग्रेसचे अमजद पठाण, पटेल बिरादरीचे शाहिद पटेल, समाजवादी पक्षाचे रिजवान जागीरदार, कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी, अब्दुल्लाह सर, इरफान सालार आदींसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत या घटनेतील बर्बरता आणि दरिंदगीबद्दल सविस्तर चर्चा झाली. एसपी शाहब यांनी सांगितले की आतापर्यंत पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली असून, काँग्रेस नेत्यांनी व गावकऱ्यांनी दिलेल्या काही संशयितांची नावेही तपासात विचारात घेतली जातील. त्यांनी आश्वासन दिले की तपास पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने होईल.

मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) लावण्याची आणि विशेष तपास पथक (एसआयटी) गठित करण्याची मागणी केली. ही घटना हिंदू-मुस्लिम समाजातील प्रत्येकाने व्यक्तिगत स्तरावर निषेधार्ह ठरवली असून, एसपी शाहब यांनीही दुःख व्यक्त करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईचे आश्वासन दिले.