“जनता त्रस्त, मनपा मस्त!” – जनअधिकारांसाठी SDPIचा औरंगाबादमध्ये जोरदार इशारा

“जनता त्रस्त, मनपा मस्त!” – जनअधिकारांसाठी SDPIचा औरंगाबादमध्ये जोरदार इशारा

✍️ महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- येथे जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या विरोधात SDPIच्या वतीने गुरुवारी, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी महानगर पालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांना १४-१४ दिवसांनी पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात असून, तात्काळ दिलासा देत ७ दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच, गरीब नागरिकांवर कोणतीही पूर्वसूचना, कायदेशीर प्रक्रिया, पर्याय किंवा मोबदला न देता सुरू असलेल्या बुलडोजर कारवायांवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी SDPIने केली आहे. या कारवाया अन्यायकारक असून प्रशासनाने पारदर्शक आणि कायदेशीर मार्गाने निर्णय घ्यावेत, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोकशाही मूल्यांचा अवमान होऊ नये, जनतेचा आवाज ऐकला जावा आणि सर्व निर्णय संविधानिक चौकटीतच घ्यावेत, यासाठीही आंदोलनात जोरदार आवाज उठवला जाणार आहे.

📍 ठिकाण: महानगर पालिका, छत्रपती संभाजीनगर

📅 दिनांक: गुरुवार, १६ एप्रिल २०२६

⏰ वेळ: दुपारी २:०० ते सायंकाळी ५:००