"छत्रपती संभाजीनगरमध्ये इतिहासातील सर्वात मोठी कारवाई! ४९० अतिक्रमणे जमीनदोस्त; मनपाचा बुलडोझर थैमान!"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि २८ जून :- जालना रोडवरील केंब्रिज चौक ते चिकलठाणा गावदरम्यान आज मनपाने अतिक्रमणविरोधी इतिहासातील सर्वात मोठी कारवाई केली. तब्बल ४९० अतिक्रमणांची पक्की व कच्ची बांधकामे—हॉटेल, लॉज, दुकाने, शेड, गॅरेज, जाहिरात फलक, ओटे, कंपाऊंड व कमानी यांसकट—मिळून जमीनदोस्त करण्यात आली!
ही धडक कारवाई प्रशासक जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे, नगररचना उपसंचालक श्री. गरजे, यांत्रिकी विभागाचे अमोल कुलकर्णी तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाईचं भव्य स्वरूप :
३५० मनपा अधिकारी व कर्मचारी
४०० पोलिसांचं चोख बंदोबस्त
२० जेसीबी, ५ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रूग्णवाहिका, २ अग्निशमन बंब, इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने व कोंडवाडा गाड्या अशा भरघोस यंत्रसामग्रीसह कारवाई पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी : उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जून गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, गिरी, राहूल जाधव, नईम अन्सारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, तृप्ती जाधव आदींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
विरोधकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार!
कारवाईला अडथळा आणणाऱ्या ४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असून, अंदाजे ६ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर गुंठेवारी कायद्यानुसार नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.
मनपाची कारवाई – शहारातील ‘बुलडोझर’ इतिहासात नोंदवली जाणार!
ही कारवाई छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी मोहिम ठरली असून, आगामी कारवायांसाठी एक कठोर इशारा मानला जात आहे.
"आजची कारवाई म्हणजे कायद्याचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित करणारा टप्पा आहे!"