खुनाचा उलगडा अवघ्या 4 तासांत! कोणताही ठोस पुरावा नसताना वाळुज पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ – आरोपी जेरबंद

खुनाचा उलगडा अवघ्या 4 तासांत! कोणताही ठोस पुरावा नसताना वाळुज पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ – आरोपी जेरबंद
खुनाचा उलगडा अवघ्या 4 तासांत! कोणताही ठोस पुरावा नसताना वाळुज पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’ – आरोपी जेरबंद

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- मु. पो. मुरमी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथील 17 वर्षीय कुमारी वैष्णवी संतोष निळ हिचा 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3.30 ते 4.00 वाजेच्या दरम्यान तिच्याच राहत्या घरात निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी तिची आई मथुरा संतोष निळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. 376/2025 अन्वये कलम 103 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर आरोपीने अत्यंत शिताफिने घटनास्थळावरून पलायन केल्याने गुन्ह्याची उकल करणे हे वाळुज पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसतानाही वाळुज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चार तासांत आरोपीला निष्पन्न करून अटक केली.

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी तपास पथक व विशेष पथकाला तातडीने कामाला लावले. पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मुरमी गावातील नानासाहेब कडुबा मोरे (वय 27 वर्षे) याला पहाटे ताब्यात घेतले.

सखोल चौकशीदरम्यान आरोपीने खून केल्याची कबुली दिली असून दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 3.35 वाजता त्याला अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे हे करत आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. भागीरथी पवार तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

👉 अवघ्या काही तासांत खुनाचा पर्दाफाश करून वाळुज पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या धडक कारवाईची प्रचिती दिली आहे.