खत टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल; काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

खत टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल; काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
खत टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल; काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र वाणी न्युज दि ६ ऑगस्ट

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या खतांच्या टंचाईविरोधात काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक ५ ऑगस्ट रोजी निवेदन दिलं. केंद्र सरकारकडून मंजूर खताचा पुरवठा दरमहा ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी केला जात असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय वाढली आहे.

या निवेदनात म्हटलंय की, शेतकऱ्यांना खते चढ्या दराने विकत घ्यावी लागत आहेत, जे त्यांच्या आर्थिक पाठिंब्याला मोठा ताण देत आहे. यामुळे शेतीचं नियोजन कोलमडत असून, वेळेवर खते न मिळाल्याने पिकांचं उत्पादनही घटत आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांना अनावश्यक औषधं सक्तीने खरेदी करावी लागत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं. ही औषधं युरियासोबत जोडून विकली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

ही मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस रस्त्यावर; सरकारने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा!