काँग्रेस पक्षात नवे दमदार चेहरे; ३ ऑगस्टला सत्कार समारंभ
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ ऑगस्ट :– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग व NSUI च्या प्रदेश कार्यकारिणीवर नुकतीच नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता गांधी भवन, पक्ष कार्यालय येथे पार पडणार आहे.
हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, आजी-माजी आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, उमेदवार, ज्येष्ठ नेते तसेच युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, महिला काँग्रेस, इंटक, अल्पसंख्यांक, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती विभाग व विविध सेलचे अध्यक्ष-पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनीत:
मा. किरण पाटील डोणगावकर
अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी
मा. शेख युसुफ
अध्यक्ष, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव, नव्या उमेदांची नोंद – ३ ऑगस्ट, गांधी भवन येथे!