"करातून सुटका – शास्तीमाफीची सुवर्णसंधी!"स्वातंत्र्य दिन व मराठवाडा मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची खास योजना जाहीर

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ जुलै :–
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सन २०२५-२६ आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीत आतापर्यंत ६२.५६ कोटी रुपयांची भर घातली असून, एकूण ६३,७८१ मालमत्ताधारकांनी आपला कर भरला आहे. मात्र, अजूनही अनेकांची थकबाकी प्रलंबित असल्याने त्यावर आकारण्यात आलेली शास्ती माफ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
महापालिका अधिनियमानुसार, थकीत करावर २% दराने शास्ती आकारली जाते. परंतु भारतीय स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (१७ सप्टेंबर) हे लक्षात घेता, आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी “शास्ती माफी योजना” जाहीर केली आहे.
योजना पुढीलप्रमाणे असेल:
🔹 “शास्तीची आजादी”
दि. १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास, शास्तीवर ९५% सवलत मिळेल.
🔹 “शास्तीची मुक्ति”
दि. १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२५ दरम्यान थकीत कर एकरकमी भरल्यास, शास्तीवर ७५% सवलत दिली जाईल.
या योजनेचा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी शहरातील सर्व रहिवाशांना केले आहे.
🟢 कर भरून 'शास्तीपासून मुक्ती' मिळवा – हीच वेळ आहे!