कन्नड तालुक्यात अमजद मिर्झा यांची अल्पसंख्याक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
जुने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते मिर्झा यांच्यावर विश्वासाचा ठसा
महाराष्ट्र वाणी न्युज
कन्नड दि ४ :- कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथील काँग्रेस पक्षाचे जुने, निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते अमजद मिर्झा यांची कन्नड अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घकाळाच्या पक्षनिष्ठा आणि सामाजिक कार्याची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आली आहे.
ही नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार इमरान प्रतापगढी,
राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी मोहम्मद अहमद खान,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याणराव काळे,
जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर
आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसूफ भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नियुक्तीपत्र देताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सचिव नासेर नजीर खान,
अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अनिस पटेल,
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आमेर अब्दुल सलीम,
इंटक काँग्रेस शहराध्यक्ष शेख अथर,
अकील पटेल, मुजफ्फर खान, मसरूर सोहेल खान, बाबा बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल अमजद मिर्झा यांनी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानत म्हटले की, “काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन.”
या नियुक्तीमुळे कन्नड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
🔹 – महाराष्ट्र वाणी डिजिटल
"जनतेचा आवाज, महाराष्ट्राचा अभिमान!"