"ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार द्या – आ.रोहीत पवारांची मागणी"

"ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार द्या – आ.रोहीत पवारांची मागणी"

महाराष्ट्र वाणी न्यूज 

मुंबई दि २३ :- राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना सरकारकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्री सतत "नुकसानीची पाहणी सुरु आहे, पंचनामे सुरु आहेत, मदत देतोय, सकारात्मक आहोत" अशी वेळकाढूपणाची भाषा करत आहेत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती NDRF च्या निकषानुसार हेक्टरी ८५०० म्हणजेच एकरी केवळ ३४०० रुपये एवढाच भोपळा देत आहेत. "महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असताना सरकारकडून शेतकऱ्यांना हा भोपळा देणं शोभत नाही," असा घणाघात पवार यांनी केला.

शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सरकारला निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करून दिली. "आज शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे ही वेळेची गरज आहे. सरकारने #ओला_दुष्काळ घोषित करावा आणि सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल," असा इशाराही रोहीत पवार यांनी दिला.

शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवणार की पुन्हा आश्वासनांची पाटी वाचून वेळ मारून नेणार?