उद्या पाडापाडी नाही; बीड बायपास, सातारा-देवळाई परिसरात उद्या महापालिकेची कागदपत्रांची तपासणी

दिनांक 14 जुलै रोजी बीड बायपास रोड आणि सातारा-देवळाई परिसरातील मालमत्ताधारकांची कागदपत्र तपासणी होणार

उद्या पाडापाडी नाही; बीड बायपास, सातारा-देवळाई परिसरात उद्या महापालिकेची कागदपत्रांची तपासणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 13 जुलै –

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या, दिनांक 14 जुलै रोजी बीड बायपास रोड आणि सातारा-देवळाई परिसरातील मालमत्ताधारकांची कागदपत्र तपासणी होणार आहे.

महानगरपालिकेच्या पथकांकडून या भागातील डीपी रोडलगतच्या मालमत्तांबाबत बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण दाखला आणि मालमत्ता कर भरणा यासारखी कागदपत्रे तपासली जाणार आहेत. जे मिळकतधारक ही कागदपत्रे सादर करण्यात असमर्थ ठरतील, त्यांच्या मालमत्तांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शहरातील आमदार-खासदारांच्या उपस्थितीत या मोहिमेला वेग देण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार, सामासिक अंतरात येणाऱ्या सर्व मालमत्तांची वैधता तपासली जाणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रात येण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून घेतलेल्या बांधकाम परवानग्या मान्य केला जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच, जे नागरिक आपली मालमत्ता तात्काळ गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करु इच्छितात, त्यांना संधीही देण्यात येणार आहे.

महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी या भागातील नागरिकांनी पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कागदपत्रांसह तयार राहण्याचे सूचित केले आहे.

 शेवटी एकच विनंती – वैध कागदपत्रे आहेत ना? तपासणीपूर्वी निश्चित करा!